भाजप जिल्हाध्यक्ष जाहीर : चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी श्री हरिष शर्मा यांची व महानगर जिल्हाध्यक्ष पदी राहुल भाऊ पावडे #bjp - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



भाजप जिल्हाध्यक्ष जाहीर : चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी श्री हरिष शर्मा यांची व महानगर जिल्हाध्यक्ष पदी राहुल भाऊ पावडे #bjp

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करुन 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत.

भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी श्री हरिष शर्मा यांची व महानगर जिल्हाध्यक्ष पदी राहुल भाऊ पावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



Pages