खबरकट्टा/चंद्रपूर:
सांस्कृतिक कार्य संचालनालया द्वारे आयोजित 60 व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर या संस्थेतर्फे रूपक हे नाटक सादर करण्यात आले होते. त्यात कु. बकुळ धवने हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून रौप्यपदक जाहीर झाले होते . हा पारितोषिक वितरण सोहळा आज मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडला. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री विकास खारगे, ज्येष्ठ दिग्दर्शक श्री प्रमोद पवार , ज्येष्ठ अभिनेते श्री अरविंद पिळगावकर यांच्या हस्ते बकुळ ला रौप्यपदक प्रदान करण्यात आले.#khabarkatta chandrapur
रजनीश जोशी लिखित या नाटकाचे दिग्दर्शन नूतन धवने यांचे होते. प्रकाशयोजना हेमंत गुहे यांची तर नेपथ्य तेजराज चिकटवार व पंकज नवघरे यांचे होते. संगीत लिलेश बरदाळकर यांचे होते. या नाटकात विशाल ढोक , रोहिणी उईके व बकुळ धवने यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एका पेइंग गेस्ट असलेल्या मुलीवर एक निपुत्रिक दाम्पत्य स्वतःच्या अपत्या प्रमाणे प्रेम करते व तीच मुलगी प्रियकराने रचलेल्या षड्यंतत्रास बळी पडून त्या दाम्पत्याची हत्या करते असे कथानक असलेले हे नाटक स्पर्शावर भाष्य करते.#khabarkatta chandrapur