खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर नागपूर रोड वर घोडपेठ जवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली असून मृतकांपैकी एक साई इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे.
यश देवाळकर या मृतकाची ओळख पटली असून दुसऱ्या तरुणाची ओळख पटलेली नाही. सदर मृतकांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.