शासकीय रुग्णालयातुन नवजात बाळाची चोरी...#Newborn baby stolen from government hospital - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शासकीय रुग्णालयातुन नवजात बाळाची चोरी...#Newborn baby stolen from government hospital

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयामधुन चार दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असुन ह्यामुळे रुग्णालय प्रशासनावर तसेच सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार चार दिवसांपूर्वी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात एका महिलेची प्रसुत झाली. मात्र आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्या महिलेच्या शेजारी असलेले बाळ दिसेनासे झाले. सुरुवातीला नातेवाईकांनी बाळाला कोवळे उन्ह दाखवायला बाहेर नेले असेल असा मातेचा समज झाला मात्र नातेवाईकांनी बाळाला बाहेर नेले नसल्याचे स्पष्ट होताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.#khabarkatta chandrapur

रुग्णालयात सर्वत्र शोधाशोध करूनही बाळ आढळुन न आल्याने पोलीस तक्रार देण्यात आली असुन ह्या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासन तसेच रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयात सुरक्षेसाठी खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आले असुन त्यांचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे मात्र बरेचदा हे सुरक्षा रक्षकांना रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खाजगी कामासाठी सुद्धा तैनात व्हावे लागते त्यामुळे अर्थातच सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर सोडल्या जाते. पोलिसांना तक्रार प्राप्त होताच रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासणे सुरू केले आहे.#khabarkatta chandrapur


Pages