चंद्रपूर मनपा करणार 25 हजार वृक्षाची लागवड...#Chandrapur Municipality will plant 25 thousand trees - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर मनपा करणार 25 हजार वृक्षाची लागवड...#Chandrapur Municipality will plant 25 thousand trees

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात मनपातर्फे 25 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असुन या मोहीमेत शहरातील सर्व नागरीक, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग अतिशय आवश्यक असुन मोहीमेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.#khabarkatta chandrapur

आज आपण वृक्ष लावले तर येत्या 10 ते 15 वर्षानंतर त्या वृक्षाची सावली आपणास मिळेल, आपल्या शहराची वाढती उष्णता पाहता वृक्षाचे महत्व आजच समजुन घेणे आवश्यक आहे. प्रखर उन्हात आपण पाहतो की फेरीवाले, भाजीवाले हे वृक्षाखालीच उभे असतात, कार, टू व्हीलरची पार्कींग सुद्धा झाडाखालीच केली जाते, मग आपण गाडी लावण्यास जेव्हा झाड शोधतो तर झाडे लावण्यास जागा शोधणेही आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगीतले.#khabarkatta chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यात येत्या पावसाळ्यात वटवृक्ष, कडूनिंब यासह इतर एकूण 10 लक्ष वृक्ष लागवड महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. सदर वृक्ष लागवडीसाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असुन महानगरपालिकेतर्फे 25 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यात लोकसहभाग वाढावा म्हणून आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक 12 जून रोजी मनपा सभागृहात घेण्यात आली.

चंद्रपुरात होणार गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, पालकमंत्री मुनगंटीवार यांचा पुढाकार

पर्यावरण रक्षणासाठी हरित क्षेत्राचा समतोल राखणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. एकूण क्षेत्रफळाच्या 33 टक्के क्षेत्र हरित असणे आवश्यक आहे. चंद्रपूर शहरामध्ये वन भाग व वृक्ष गणनेनुसार हरित क्षेत्र हे 27.6 टक्के आहे त्यामुळे 33 टक्के हरित क्षेत्र पुर्ण करण्याकरीता 5.6 टक्के हरित क्षेत्र वाढविण्याची आवश्यकता असल्याने वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहे.

मनपातर्फे वृक्ष लागवड मोहिमेची सुरवात श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी क्रीडा संकुल येथे 11 वटवृक्ष लावुन तसेच बाबुपेठ स्मशानभुमी येथेही वटवृक्ष व कडुलिंबाचे वृक्ष लाऊन करण्यात आली आहे.#khabarkatta chandrapur

महानगरपालिका क्षेत्रात 121 अभिन्यासातील खुली जागा व 27 मनपा शाळेत 1000 वटवृक्ष, ओपन स्पेस व इतर ठिकाणी 3800 कडूनिंब वृक्ष तसेच उद्याने, रस्त्याच्या बाजुला अश्या जागी 20200 असे एकुण 25 हजार वृक्ष महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातुन लावण्यात येणार आहेत. काही जागी एकाच प्रजातींची झाडे लावुन त्यांना गुलमोहर रोड, चाफा रोड, कडुलिंब रोड असे नावे देण्याचाही मनपाचा प्रयत्न असणार आहे. लोकसहभाग वाढविण्यास " सुंदर माझे उद्यान" व " सुंदर माझी ओपन स्पेस' स्पर्धासुद्धा महानगरपालिकेमार्फत घेण्यात येणार आहे.

याप्रसंगी इको प्रोचे बंडु धोत्रे यांनीही मार्गदर्शन केले तसेच माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टवार यांनी त्यांच्या प्रभागातील 19 ओपन स्पेस जागेत

याप्रसंगी इको प्रोचे बंडु धोत्रे यांनीही मार्गदर्शन केले तसेच माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टवार यांनी त्यांच्या प्रभागातील 19 ओपन स्पेस जागेत लोकसहभागाने वृक्षारोपण करण्याची इच्छा दर्शविली तसेच इतर सर्व स्वयंसेवी संस्थांनी झाडे लावण्यास जागा शोधुन वृक्षारोपण करणे व संवर्धनाची तयारी दर्शविली. या मोहीमेत सहभागी होण्यास व वृक्षारोपण करण्यास जागा सुचविण्यासाठी या 8668708435 क्रमांकावर संपर्क साधावा अथवा https://docs.google.com/forms/d/e/ 1FAIpQLScsWGwnvDz6Bp2ooA6hGTa CYVHhJIUGKRIyekEQJqKMtrInw/viewform? vc=0&c=0&w=1&fir=0 या गुगलिंकवर माहीती भरावी.

बैठकीस पतंजली योग समिती, योगनृत्य परिवार, गुरुदेव सेवा मंडळ, आरुषी सोशल फाऊंडेशन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळ, रोटरी क्लब, श्री. स्वामी समर्थ बालोद्यान, भारत स्वाभिमान, गार्डन क्लब या सर्व स्वयंसेवी संस्थांचे सदस्य उपस्थीत होते.


Pages