मोदी@09 साठी नागपूरचे महापौर आज चंद्रपूरात...#Mayor of Nagpur today in Chandrapur for Modi@09 - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मोदी@09 साठी नागपूरचे महापौर आज चंद्रपूरात...#Mayor of Nagpur today in Chandrapur for Modi@09

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
भारत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री विश्वगौरव मा. नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला 9वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी @9 च्या अंतर्गत पंतप्रधान व सर्व मंत्रीमंडळ यांच्या कार्याच्या यशस्वितेचा गौरव करण्यासाठी अभिनंदन सोहळा डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे 21 जून,सायंकाळी 7 वाजता आयोजित केला आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून हंसराजजी अहीर अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग यांची तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर मुनगंटीवार ,मंत्री सांस्कृतिक, वने, मस्त्य तथा पालकमंत्री जि. चंद्रपूर-गोंदिया यांची व प्रमुख वक्ता म्हणून दयाशंकर तिवारी महापौर, नागपूर,यांची उपस्थिती राहणार आहे.#khabarkatta chandrapur 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवराव भोंगळे जिल्हापक्ष भाजपा (ग्रा),जेष्ठ नेते विजय राऊत,प्रमोद कडु, खुशाल बोंडे यांची उपस्थिती राहील अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,राजेंद्र गांधी, राजेश मुन, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले यांनी दिली आहे.यशस्वीतेसाठी राहुल पावडे, अंजलीताई घोटेकर, अनिल फुलझेले, राजेंद्र अडपेवार, मोहन चौधरी, शाम कनकम, विशाल निंबाळकर, डॉ. किरण देशपांडे, डॉ. सात्वीक गुंडावार, दिवाकर पुद्दटवार, मो. जिलानी, विवेक आंबेकर, राखीताई कंचर्लावार, संदिप आवारी, प्रकाश धारणे, संजय कंचर्लावार, रवि आसवानी, धम्मप्रकाश भस्मे, धनराज कोवे, विनोद शेरकी, आमीन शेख, सचिन कोतपल्लीवार, संदिप आगलावे, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, रवि लोनकर परिश्रम घेत आहेत.#khabarkatta chandrapur 

Pages