खबरकट्टा/चंद्रपूर:
मुल तालुक्यातील येणाऱ्या नलेश्वर येथील गायमुख देवस्थान जवळील असलेल्या गाव तलावत नेहमी प्रमाणे बैल धुण्यासाठी गेला असता तोल गेल्याने खोल पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतक आकाश लक्ष्मण कुमरे वय 24 वर्ष असे नाव आहे.#khabarkatta chandrapur
मृतक आकाश लक्ष्मण कुमरे वय 24 वर्ष हा युवक नलेश्वर गायमुख जवळील गाव तलावात सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास बैल धुण्यासाठी गेला असता खोल पाण्याचा अंदाज मुळे त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. गावात सर्वत्र हळहळ होत असून त्याचे पश्चात आई आणि दोन भाऊ व एक बहिण असा आप्त परिवार आहे.#khabarkatta chandrapur
