खबरकट्टा/चंद्रपूर :
गर्दीचा फायदा घेत बस, ट्रेन व ऑटो मध्ये बसलेल्या महिला प्रवाश्यांच्या पर्स मधून दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. यात दोन महिलांना रामनगर पोलीसांनी अटक करून 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 19 मे 2023 गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील भिक्षी माल येथील एक महिला लग्नकार्याकरिता आपले पतीसह चंद्रपूर येथे एसटी बस ने आल्या, काही कामानिमित्त जटपुरा गेले तिथून तुकुम जाण्यासाठी पतीसह ऑटोत बसले असता दोन अनोळखी महिला ऑटोत बसल्या व गर्दी नसतानाही फार गर्दी दाखवत बस स्थानकाजवळ उतरल्या थोडे समोर गेल्यावर महिलेच्या पर्स ची चैन उघडून असल्याचे आढळले त्यातील दागीने व रोख रक्कम चोरी गेल्याने सदर महिलेने विलंब न करता थेट रामनगर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.#khabarkatta chandrapur
रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्र 523/2023 कलम 379,34 भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.#khabarkatta chandrapur
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले, तिथून बल्लारपूर रोडवर शोध घेतला असता ऑटोत जात असतांना आरोपी महिलांना तक्रारकर्त्या महिलेनी ओळखले त्यावरून आरोपी 2 महिलांना ताब्यात घेत महिला पोलिसांकडून झडती घेतली असता चोरी गेलेले दागिने व रोख रक्कम प्राप्त झाली त्यावरून महिलांना ताब्यात घेत रकम व दागिने जप्त करण्यात आले.#khabarkatta chandrapur
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, प्रशांत शेंदरे, मिलिंद दोडके, पुरुषोत्तम चिकाटे, आनंद खरात, निलेश मुळे, सतीश अवथरे, लालू यादव, विकास जाधव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदीप कामडी व वैशाली अलोने यांनी केली.

