2020 साली पोलिस उपनिरिक्षक पदाकरिता झालेल्या परिक्षेचा निकाल अद्यापही जाहिर करण्यात आलेला नाही. सदर प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने निकाल जाहिर करण्यात विलंब होत आहे. मात्र आता यामुळे सदर परिक्षा देणा-या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याची दखल घेत न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून सद्यास्थितीत अंतिम मेरिट लिस्ट लावण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चंद्रपूर मतदार संघाच्या विविध विषयांवर चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी सदर मागणी केली आहे.#khabarkatta chandrapur
मार्च 2020 साली राज्य शासनाच्या वतीने पोलिस उपनिरिक्षक पदाकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली. पूर्व परीक्षा घेण्याकरिता कोरोना महामारी व मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या कारणामुळे उशीर झाला. त्यानंतर पूर्व, मुख्य , शारीरिक चाचणी व मुलाखत संपन्न झाल्यात परंतु जाहिरातीच्या वेळी मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्य शासनाने शासन निर्णय काढून एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुला प्रवर्ग किंवा पात्र असल्यास ई डब्लु एस प्रवर्गात अर्ज सुधारणा करण्याचा शासन निर्णय प्रकाशित केला. परंतु या शासन निर्णयाविरुद्ध काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधीकरणाकडे धाव घेतली त्यानंतर सदर शासन निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधीकरणे रद्द केला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधीकरणाच्या या निर्णयाविरोधात राज्य शासन उच्च न्यायालयात गेले त्यामुळे हे प्रकरण आता न्याय प्रविष्ट आहे.#khabarkatta chandrapur
परिणामी या परीक्षेचा अंतिम निकाल राखून ठेवलेला आहे. निकाल प्रलंबित असल्यामुळे सदर उमेदवारांपूढे पूढे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय नैराश्यात आहे. तसेच 2021 व 2022 ची भरती प्रक्रिया सुद्धा त्यामुळे प्रलंबित राहिलेली आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून सद्यास्थितीत अंतिम मेरिट लिस्ट लावण्यात यावी आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय येईल त्यावेळेस प्रोव्हिजनल व अंतिम निकाल जाहिर करण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.#khabarkatta chandrapur
