CM एकनाथ शिंदे यांचा पुरवणीयोजित चंद्रपूर दौरा रद्द #cmshinde - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



CM एकनाथ शिंदे यांचा पुरवणीयोजित चंद्रपूर दौरा रद्द #cmshinde

Share This

खबरकट्टा / अपडेट :


आज 31मे 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुरवणीयोजित(तात्काळ जोडलेला )चंद्रपूर दौरा रद्दकरून इतरत्र वाळविण्यात आला आहे.

--------------------------------

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धानोरकर कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट #khabarkatta

खबरकट्टा / चंद्रपूर :

बाळू धानोरकर यांचे मंगळवारी (दि.30) पहाटे 3 वाजताचे सुमारास निधन झाले. त्यांचे पार्थिव वरोरा येथे दुपारी आणण्यात आला आहे. उद्या, बुधवारी (दि. 31) दुपारी अंत्यसंस्कार होणार आहे. सायंकाळी 6 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे वरोरा येथे येत आहेत. यावेळी ते धानोरकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.#khabarkatta


मागील काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त असलेले खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांचे आज पहाटे दिल्ली येथे निधन झाले. दुपानंतर त्यांचे पार्थिव वरोरा येथे आणण्यात आ आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शन ठेवण्यात आले आहे. वरोरा येथे बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.. अंत्यसंस्काराकरीता राज्यातील अनेक नेते दाखल होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सायंकाळी वरोरा येथे धानोरकर कुटुंबियांची भेट घेण्यासाठी येत आहेत. शिर्डी येथून त्यांचे 4.20 मिनिटांनी नागपूरला आगमन होईल. यानंतर नागपूर येथून 5 वाजता चंद्रपूर येथील मोरवा विमानतळावर आगमन होईल. तेथून ते वरोराकडे प्रस्थान करतील 6.10 वाजता वरोरा येथे पोहचून धानोरकर कुटुंबियांची ते भेट घेतील.


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) व कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करतील. या ठिकाणी ते अर्धा तास थांबतील त्यानंतर ते नागपुर मार्गे मुंबईला रवाना होतील, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे.#khabarkatta

Pages