राजकीय भूकंप: जयंत पाटील यांना ईडीची नोटीस...#ED notice to Jayant Patil - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राजकीय भूकंप: जयंत पाटील यांना ईडीची नोटीस...#ED notice to Jayant Patil

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीशीतून देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना नोटीस धाडल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाकडून आज निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वांचं लक्ष त्या निकालाकडे लागलेलं असताना पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.#khabarkatta chandrapur

इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस मनीलाँड्रिंग आणि 570 कोटी रुपयांच्या मालमत्तांची जप्ती या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पहिले आरोपपत्र दाखल केले होते. आयएलअँडएफएसप्रकरणी ईडीने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि ब्रुसेल्स (बेल्जियम) येथील निवासी व व्यावसायिक इमारती आणि बँक खाती जप्त केलेली आहेत.#khabarkatta chandrapur

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही याआधीही या कंपनी प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.#khabarkatta chandrapur

Pages