शासनाचा स्पर्धेच्या पत्रकात सावलीचा बसस्थानकाचा फोटो:शिंदे-फडणवीस सरकार चे नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी मानले आभार...#Bus station photo of shadow in government's competition sheet - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शासनाचा स्पर्धेच्या पत्रकात सावलीचा बसस्थानकाचा फोटो:शिंदे-फडणवीस सरकार चे नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी मानले आभार...#Bus station photo of shadow in government's competition sheet

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ व सुंदर बसस्थानक ही स्पर्धा सुरू केली आहे त्याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर अभियान असे नाव दिले असून या स्पर्धा पत्रके शासनाचा वतीने जाहीर करण्यात आले. त्यात स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो तसेच त्यात सावली बसस्थानकाचा फोटो टाकण्यात आलेला आहे.ही पत्रके संपूर्ण महाराष्ट्र भर फिरणार आहे. महाराष्ट्र मध्ये सावली चा बसस्थानक हा जाणार आहे.#khabar katta chandrapur 

त्यामुळे सावली वासीयांसाठी ही गौरविण्यात येणारी बाब असून शासनाच्या स्पर्धेच्या प्रचार यंत्रणेत सावली बसस्थानकाचा फोटो दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,पालकमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, खासदार अशोकजी नेते,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे सह शिंदे-फडणवीस सरकार चे आभार सावली येथील नगरसेवक, गटनेता तथा भाजप महामंत्री सतीश बोम्मावार यांनी मानले आहे.##khabarkatta chandrapur 



Pages