खबरकट्टा/चंद्रपूर:
वर्धा : जिल्ह्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय संख्येने वाढत असल्याचे चित्र आहे. त्यात हिंगणघाट तालुका तर आघाडीवर असल्याचे दिसून येते.
हर्षल नावाच्या मुलाने पीडित अल्पवयीन मुलीला भूलथापा देत नांदोरी चौकात बोलावून घेतले. तिथे त्याने मुलीला बळजबरीने आपल्या दुचाकीवर बसवून घरी नेले. लग्नाचे आमिष देत तिच्यावर जबरीने शारीरिक अत्याचार केले. ही धक्कादायक घटना मुलीने घरी येत पालकांना सांगितली.#khabarkatta chandrapur
त्यांनी हिंगणघाट पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. आरोपी विरोधात पोक्सो व अन्य कलमांखाली गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेने अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले आहे.#khabarkatta chandrapur 

