खबरकट्टा/चंद्रपूर:
नम्रपणे सुचित करण्यांत येते की,उद्या गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी राज्यातील पत्रकारांच्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्हाॅईस आँफ मीडियाच्या वतीने राज्यातील संपुर्ण जिल्हे आणि तालुक्यात धरणे आंदोलन करीत आहोत.#khabarkatta chandrapur
त्यानुषंगाने आपणही *गोंडपिपरी येथील तहसील कार्यालय (जुने) समोर उद्या सकाळी 11 वाजतापासून धरणे आंदोलन करणार आहोत.* तेव्हा व्हाॅईस आँफ मीडियाचे तालुक्यात कार्यरत असलेले संपुर्ण विंगचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी यासह तालुक्यात विविध माध्यमातील कार्यरत पत्रकारांनी उद्या 11 मे रोजी दुपारी 3 वाजतापर्यंत तहसील कार्यालय समोरील आंदोलनस्थळी पोहोचण्याची तसदी घ्यावी.उद्या सकाळी 11 वाजतापासून आपले धरणे आंदोलन सुरू होणार असून आंदोलनानंतर मा.तहसिलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना सामुहिक स्वाक्षरीचे निवेदन देणार आहोत.तरी तालुक्यातील तमाम पत्रकार बांधवांनी गोंडपिपरीत दाखल होवून आंदोलनात सहभागी व्हावे.
