खाजगी रुग्णालयातील 22 वर्षीय परिचारिकेची आत्महत्या...#22-year-old nurse commits suicide in a private hospital - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



खाजगी रुग्णालयातील 22 वर्षीय परिचारिकेची आत्महत्या...#22-year-old nurse commits suicide in a private hospital

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
वरोरा : खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असणाऱ्या एका 22 वर्षीय युवतीने घरातच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. मोनाली संतोष पेंदोर (22) असे मृत युवतीचे नाव आहे.#khabarkatta chandrapur

मूळची परसोनी येथील मोनाली ही मोकाशी ले- आउट वरोरा येथे मागील वर्षभरापासून तिच्यासोबत खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करणाऱ्या अन्य दोन परिचारिकांसोबत राहात होती. एका परिचारिकेची सकाळी ड्युटी होती, तर एक गावाकडे गेली होती. मृतक मोनालीची ड्युटी रात्री असल्याने ती रूमवरच होती. कोणी नसल्याचे बघून तिने गळफास घेतला. सकाळची ड्युटी आटोपून सायंकाळच्या सुमारास ती रूमवर आली असता मोनालीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

याबाबत वरोरा पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.#khabarkatta chandrapur


Pages