खबरकट्टा/चंद्रपूर:
बुधवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग - क्रमांक 30 वर बोलेरो व ट्रक च्या धडकेत एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली, मृतकांमध्ये दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.
धमतरी जिल्ह्यातील सोहेम गावातील लग्न सोहळा आटोपून साहू कुटुंब कांकेरला जात होते, रात्री 9.30 वाजता राष्ट्रीय महामार्ग 30 वर बालोद येथुन जात असताना त्यांच्या बोलेरो वाहनाला ट्रक ने जोरदार धडक दिली, यामध्ये 1 बालक, 5 महिला व 4 पुरुषांचा जागीच मृत्यू झाला तर दीड वर्षाच्या मुलीला उपचारासाठी नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला.
ट्रक ने बोलेरो वाहनाला धडक दिल्यावर ट्रक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे, मृतांमध्ये धर्मराज साहू, उषा साहू, केशव साहू, तोमीन साहू, लक्ष्मी साहू, रमा साहू, शैलेंद्र साहू, संध्या साहू, इशांत साहू, योगांश साहू व चालक दमेश ध्रुव यांचा समावेश आहे.#khabarkatta chandrapur
पोलिसांनी फरार ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली असून लवकरचं चालकाला अटक करण्यात येईल अशी माहिती एसपी जितेंद्र यांनी दिली आहे.#khabarkatta chandrapur

