पोहायला गेलेल्या तरुणांचा तलावात बुडून मृत्यू...#Youth who went swimming drowned in the lake - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पोहायला गेलेल्या तरुणांचा तलावात बुडून मृत्यू...#Youth who went swimming drowned in the lake

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

पाेहण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा खाेल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना चिमूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गडीतलाव येथे मंगळवार (दि.19) सकाळच्या सुमारास घडली.#khabarkatta chandrapur 

प्रज्वल रामभाऊ चौधरी (22, रा. पळसगाव ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा प्रितम डोमा शिवरकर (वय 22),पियुष रतन शिवरकर (वय 12),नितेश पुंडलिक गायकवाड (20) या तीन मित्रांसाेबत पिपर्डा वन हद्दीतील शेती परिसरातील गड्डीतलाव येथे फिरण्यासाठी आले हाेते. त्यांनी गडीतलाव तलावाजवळ पाेहायाचा मोह बनविला.

त्यांनी पोहायला सुरवात केली मात्र पाणी कमी असल्याने त्यांनी पाचशे मिटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या टोकावर जात पोहायला सुरवात केली अशात प्रजवल ला तलावात पाेहण्याचा माेह झाल्याने ताे खोल तलावात उतरला. मात्र, खाेल पाण्यात गेल्याने ताे गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले.#khabarkatta chandrapur 

मात्र, त्यात त्यांना अपयश आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पळसगांव वनपरिक्षेत्रचे वनपाल विनोद किलनाके, वनरक्षक ठाकरे,वनरक्षक दांडेकर यांच्या सह चिमूर पाेलीस चाैकीचे पाेलीस उपनिरीक्षक भीषमराज सोरते, मेजर गेडाम पो प्रवीण गोनाडे, रोशन तांमशट्टीवार घटनास्थळी पाेहाेचले. दुपारी प्रजवलचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. चिमूर पाेलिसांनी घटनेची नाेंद केली असून,पुढील तपास सुरू केला आहे.#khabarkatta chandrapur 

Pages