राज्यातील सत्तासंघर्ष, सत्तांतर आणि आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी या सर्व घडामोडींनंतर (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रचारासाठी नवी रणनीती आखली आहे. त्यानुसार एक सल्लागार समिती नेमली जाणार असून या समितीची जबाबदारी राजकारणातील चाणक्य रणनीतीकार समजल्या जाणार्या (Prashant Kishor) प्रशांत किशोर यांच्याकडे सोपविली जाणार आहे.
राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना आणि भाजपा यांनी मिळून सत्ता स्थापन केली. त्यातच काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला दिले. या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला तर ठाकरे गटाला हादरा बसला. आता सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. अंतिम निकालाची वाट आहे. (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पक्षाच्या प्रचारासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.