स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची IPL क्रिकेट सट्टेबाजांवर धडक कार्यवाही...#Local crime branch Chandrapur has taken action against IPL cricket bookies - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची IPL क्रिकेट सट्टेबाजांवर धडक कार्यवाही...#Local crime branch Chandrapur has taken action against IPL cricket bookies

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

सुद्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट वर मोठया प्रमाणात सटटा लावण्यात येत असल्याने त्यावर कारवाही करन्याचे अनुसंघाने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी / कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवुन कार्यवाही करत.#khabarkatta chandrapur 

शिवाजी नगर राधाकुण शाळेचे मागे तुकुम चंद्रपुर येथे राहणारा देविदास पडगीलवार हा इंडियन प्रिमीयर लीग 2023 (IPL 2023) के. के. आर. विरूध्द आर.सि.बि या क्रिकेटच्या मॅचवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अशी खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाल्यावरून वरीष्ठांचे आदेशान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम लाईव्ह मॅचवर टीव्ही, मोबाईलवर IPL क्रिकेट सटटा चालवीतांना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन मोबाईल, टीव्ही, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण 30,010 /- रू. चा माल जप्त करण्यात आला असुन सटटेबाज नामे 1) देविदास दिलीप पडगीलवार वय 32 वर्ष रा. दे. गो. तुकुम शिवाजी नगर राधाकृष्ण शाळेचे मागे चंद्रपुर 2 ) पाहिजे आरोपी नामे अविनाश हांडे वय 37 वर्ष रा. ताडबन वार्ड चंद्रपुरयांचे विरूदध पो स्टे रामनगर येथे अप.क्र. 348 / 2023 कलम 4, 5 मु.जु.का., सहकलम 109 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.#khabarkatta chandrapur 

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पो.उप.नि. अतुल कावळे, पो. हवा. संजय आतकुलवार, नापोकॉ संतोष येलपुलवार, पोकों नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, कुंदन बावरी, रविंद्र पंधरे यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे.

Pages