चंद्रपूर जिल्ह्यात सलग चार दिवसापासून वादळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. या वादळी पावसाचा अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ वायरल झाला आहे. वेकोली खाण परिसरात एका कर्मचाऱ्याच्या अंगावर थेट वीज कोसळली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. बाबु धनकुमार महेंद्र सिहं असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.#khabarkatta चंद्रपूर
चंद्रपूर अवकाळी पावसाने अक्षरस झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. पावसाचा फटका शेतीला बसला तर अनेक घरांची पडझड झाली. वीज कोसळल्याने गडचिरोली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. वीज कोसळल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात 35 शेळ्या ठार झाले होत्या. आज वीज कोसळल्याने वेकोली कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. वेकोलीच्या माजरी क्षेत्रातील नागलोन खाण परिसरात ओव्हर बर्डनची वाहतुक करणाऱ्या बाबु धनकुमार महेंद्र सिहं या कर्मचाऱ्याचा अंगावर वीज कोसळली. ही घटना आज ( मंगळवार ) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ओसी टु नागलोण खाण परिसरात घडली.
या घटनेची माहिती मिळताच माजरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतक बाबू धनकुमार महेंद्र सिहं हा माजरी खाणीतील के.जी. सिंग कंपनीत कर्मचारी होता. आज तो खाणीतील ओवर बर्डनची वाहतूक करीत होता. दरम्यान अचानक वादळ सुरू झाले. मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. तो चालत असताना त्याचा अंगावर वीज कोसळली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर कर्मचारी मूळचा बिहार राज्यातील आहे. त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती कळविण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.#khabarkatta chandrapur

