भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 6 ते 8 एप्रिल 2023 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस व जिल्ह्यात एक, दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग 40-50 किमी प्रति तास) आणि गारा पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून 6 व 8 एप्रिल 2023 या दिवसाकरीता येलो अलर्ट व 7 एप्रिल या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.#khabarkatta chandrapur
याअनुषंगाने, नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी. पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, जवस आदी पिकांची आवश्यक काळजी घ्यावी. वीजगर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीत मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरु असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीजगर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जनावरांना मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठ्यामध्येच चारा व पाण्याची उपलब्धता करुन द्यावी.#khabarkatta chandrapur