खबरकट्टा/चंद्रपूर: :
चंद्रपुरात पुन्हा एका बँकेचा घोटाळा उघडकीस आलेला आहे या घोटाळ्यातील मुख्य चार आरोपी संचालकांना अटक करण्यात आली असून 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एदेन्स निधी बचत बँक ही सण 2018 पासून चंद्रपूर शहरातील बापट नगर परिसरातील तुकडोजी भवन येथे स्थित आहे.#khabarkatta chandrapur
नियमित दैनिक ठेवी, मासिक ठेवी व फिक्स डिपॉझिट या माध्यमातून गरीब, मजूर, छोटे व्यावसायिक अश्या ठेविदारांच्या बचतीवर अधिक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो लोकांचे ठेवी या निधी बँकेत जमा आहेत.
मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांची रक्कम परत न मिळाल्याने ठेवीदारांनी पोलीस स्टेशन गाठत सदर बँक विरुद्ध व त्यांच्या संचालकांविरुद्ध तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी एदेन्स बचत निधी बँकेचे संचालक साहूल सिमॉन, संजय रामटेके, जितेंद्र थुलकर व सुधाकर ईटेकर या चार मुख्य आरोपींना अटक केली असून सदर बँकेचा जवळपास 29 लाख 50 हजारांची फसवणूक झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर बँक घोटाळ्याची रक्कम पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.#khabarkatta chandrapur
