चिमणीप्रेमी! स्वत:च्या घरात तब्बल 225 घरटी तयार करून शेकडो चिमण्यांना आश्रय...#Sheltering hundreds of sparrows by building as many as 225 nests in their own homes - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चिमणीप्रेमी! स्वत:च्या घरात तब्बल 225 घरटी तयार करून शेकडो चिमण्यांना आश्रय...#Sheltering hundreds of sparrows by building as many as 225 nests in their own homes

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर: :

जिल्ह्यातील वरोरा शहरातील यशोदा नगर भागात राहणारे शिवशंकर यादव हे चिमणी प्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत. मुक्या पशुपक्ष्यांना वाचविण्यासह स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी त्यांनी स्वतःच्या घरात तब्बल 225 लाकडी घरटी तयार करून चिमण्यांना आश्रय दिला आहे..#khabar katta chandrapur 

ते स्वतः एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. सध्या कंपनी बंद पडल्याने निम्म्या पगारावर त्यांचा कुटुंब गुजराण करीत आहे. मात्र, तरीही चिमणी वाचवण्यासाठीचा त्यांचा संघर्ष हा वाखाणण्याजोगा आहे.

वाढते शहरीकरण, प्रदुषण, जंगलाची कमतरता यामुळे पक्षी नाहिसे होत आहे. शहरात पक्षी व पक्ष्यांचा किलबिलाट नाहीसा झाला आहे. त्यामुळे वरोरा शहरातील शिवशंकर यादव हे चिमणी वाचावी यासाठी प्रयत्नरत आहे. यासाठी त्यांनी चक्क आपल्या घरामध्ये तब्बल 225 लाकडी घरटी तयार केली आहे. जंगलातील विशिष्ट काडीकचरा आणि कापसापासून शिवशंकर यादव यांनी चिमण्यासाठी घरटे तयार केले आहे. एका घरट्यासाठी 400 रूपये खर्च त्यांना आला आहे. पावसाळ्यात या चिमण्यांना तीन किलोहुन अधिक तांदूळ, पाणी व ब्रेड देखील द्यावे लागते. पावसाळ्यात हे खाद्य तब्बल 12 किलोपर्यंत वाढवावे लागते. हे सर्व काम ते आपल्या कुटुंबाच्या मदतीने करीत असतात.#khabar katta chandrapur 

यादव यांच्या घरी मोठ्या संख्येने चिमण्या वास्तव्याला असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घरी चिमण्या ठेवण्यास विरोध केला आहे. विरोध होत असतांना विरोधाकडे दुलर्क्ष करून शिवशंकर यादव चिमण्यासाठी स्व:तच्या घरी घरटे उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमांचा पर्यावरणप्रेमी व पक्षीप्रेमींनी स्वागत केले आहे. मुक्या पशुपक्ष्यांवर प्रेम आणि आत्मिक समाधानासाठी स्वखर्चातून बांधलेली घरटी आकर्षण केंद्र ठरीत आहेत. पुढील काळात आणखी शंभर घरटी तयार करणार असल्याचे पक्षीप्रेमी शिवशंकर यादव यांनी सांगितले.

संगोपनासाठी 5 लाख खर्च करण्याची तयारी

जंगलांची बेसुमार कत्तल व जुने वाडे- घरे मोडकळीस येवून त्याठिकाणी सिमेंटच्या घरे झाल्याने चिमणी दिसेनाशी झाली आहे. अशा स्थितीत शिवशंकर यादव यांनी चिमणी जगावी यासाठी अनोखे प्रयोग राबवित आपल्या सेवानिवृत्तीनंतर सुमारे पाच लाख रुपये चिमण्यांच्या संगोपनासाठी खर्च करण्याचा मानस व्यक्त केलाआहे..#khabar katta chandrapur 

Pages