नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी युवा शेतकऱ्याचे ‘फाईव्ह स्टार’ मचान...#Young farmer's 'Five Star' Scaffolding to stay safe from natural calamities - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी युवा शेतकऱ्याचे ‘फाईव्ह स्टार’ मचान...#Young farmer's 'Five Star' Scaffolding to stay safe from natural calamities

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

रात्री बेरात्री शेतात थांबायची वेळ शेतकऱ्यांसाठी नित्याचीच. त्यात वन्यप्राण्यांचा धोका असतोच. म्हणून शेतातच सोयीयुक्त निवारा केल्या जातो. त्यास मचान म्हटल्या जाते. पण हे मचान सुध्दा पंचतारांकित हॉटेलातील खोलीला लाजवेल असे बांधण्याची बाब कमालच म्हणावी. पण तसे धाडस आर्वी तालुक्यातील कासारखेड येथील युवा शेतकऱ्याने दाखविले आहे. #khabar katta

बाजूच्या शेतात रात्री थांबलेल्या शेतकऱ्यास बिबट्याने फरफटत नेल्याचे माहित झाल्यावर योगेश माणिक लिचडे यांनी स्वतःच्या शेतात सुरक्षित मचान बांधण्याचा निर्णय घेतला. सहा फूट उंच व साडे पाचशे किलो वजनाचे मचान त्याने बांधले. ते सुसज्ज व्हावे म्हणून सोलर पॅनल बसवून पंखा व सौर दिवे लावलेत. रेडिओ पण वाजतो. मोबाईल चार्जिंगची सोय आहेच. अंतर्गत सजावट व रंगसंगती मनोवेधक अशी. दोघे जण निवांत बसू शकतात.यात बसून योगेश शेताची निगराणी करीत आहे. या आगळयावेगळ्या मचानाची चर्चा दूरवर पसरल्यास नवल ते काय. आता परिसरातील शेतकरी हा रुबाब पाहण्यास भेट देत आहे.सोबतच आम्हालाही असे बांधून दे म्हणून विनंती करीत आहे.#chandrapur

योगेश म्हणतो, की शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करणार. कमी खर्चात बांधून देण्याची तयारी आहे. हे मचान वन्यजीव व नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरू शकते,असे मत त्याने व्यक्त केले.#wardha

Pages