वर्धा : विक्रीस मनाई असलेला सुगंधित तंबाखू व गुटका विकणाऱ्या साठेबाजाचे धाबे धाड पडल्याने दणाणले आहे. स्थानिक बढे चौकातील प्रिया ट्रेडिंग व मोहता मार्केटमधील दोन दुकानांवर गुन्हे शाखेने धाड टाकून विविध कंपनीचा असा माल जप्त केला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालली.तीनही ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या तंबाखू व गुटख्याची एकूण किंमत वीस लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष चमू गठित केली होती. अवैध गुटखा मोठ्या प्रमाणात शहरात येत असून शालेय विद्यार्थी त्यास बळी पडत असल्याचे चिंताजनक चित्र आहे.#khabarkatta chandrapur

Share This
About Kshitija