धक्कादायक; अल्पवयीन मुलांचा दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार...#Shocking; Two minor girls were molested by minors - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



धक्कादायक; अल्पवयीन मुलांचा दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार...#Shocking; Two minor girls were molested by minors

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

फुलपाखरू बघितले की कोणतंही लहान मुल त्याच्यासोबत आनंदाने बागडू लागते आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. फुलपाखरू पकडण्यासाठीची दोन लहान मुलींची गडबड हेरून दोन अल्पवयीन मुलांनी या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार मारेगाव तालुक्यात उघडकीस आला.मारेगाव तालुक्यातील एका गावात रविवारी 19 मार्च रोजी दोन सहा वर्षीय मुली फुलपाखरांमागे लागल्या. ही बाब त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या 11 आणि 14 वर्षीय दोन मुलांच्या लक्षात आली. #khabarkatta

या अल्पवयीन मुलांनी त्या चिमुकल्या मुलींना फुलपाखरू पकडून देण्याच्या बहाण्याने गावाबाहेर ओसाड माळरानावर एका पडक्या घरात नेले तेथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुली घरी परतल्यानंतर त्या घाबरलेल्या दिसल्याने त्यांच्या आजीने विचारणा केली. तेव्हा मुलींनी घडलेला प्रकार सांगितला. आजीने हा प्रकार मुलींच्या पालकांना सांगितला. मुलींच्या पालकांनी दोन्ही मुलांच्या पालकांना याबाबत जाब विचारला.#chandrapur

अखेर बुधवारी मुलींच्या पालकांनी दोन्ही मुलांविरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोन्ही विधीसंघर्ष बालकांविरोधात विविध कलमांसह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करीत आहेत. या घटनेने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Pages