जागतिक महिला दिनानिमित्त; निःशुल्क भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन...#Organization of inspection camp - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



जागतिक महिला दिनानिमित्त; निःशुल्क भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन...#Organization of inspection camp

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

दिनांक ०८.०३.२०२३ ला चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,चंद्रपूर तर्फे चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सर्व महिला न्यायधिश, महिला अधिवक्ता, महिला पक्षकार, महिला न्यायालयीन कर्मचारी व महिला पोलिस करीता निःशुल्क भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिरात स्त्री रोग तज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचा रोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, छाती रोग तज्ञ, फिजिओथेरपिस्ट,कायरो थेरपिस्ट व अन्य विशेतज्ञ डॉक्टर उपस्थित होते. तसेच शुगर तपासणी, बी पी चेक अप, ई.सी.जी. चेक अप आधुनिक तांत्रिक उपकरणा द्वारे करण्यात आले.

या शिबिरात एकूण 180 लाभार्थींनी शिबिराचे लाभ घेतले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्रीमती.समृद्धी एस.भीष्म मॅडम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश,चंद्रपूर होते व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.ॲड. संध्याताई मुसळे होते. या कार्यक्रमात मा.श्रीमती.समृद्धी एस.भीष्म मॅडम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश,चंद्रपूर व मा.ॲड.संध्याताई मुसळे यांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

माननीय प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश मा.श्रीमती.समृद्धी एस.भीष्म मॅडम यांनी त्यांच्या मनोगतात असे म्हटले की, चंद्रपूर जिल्हा न्यायालय मधे पहिल्यांदाच जागतिक महिला दिनी फक्त महीलांकरिता अश्या प्रकारचा आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेले आहे व त्यांनी आयोजकांचे अभिनंदन व्यक्त केले. चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे सचिव ॲड.आशिष धर्मपुरीवार यांनी असे संबोधित केले की, जागतिक महिला दिना निमित्त सर्व महिला वर्ग साठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन नेहमी महिला अधिवक्तांच्या सेवा व सुरक्षेसाठी तत्पर असते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.अमृता वाघ व संचालन ॲड. सुजाता दुबे व आभार प्रदर्शन ॲड.मंजू लेडांगे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमान जोशी यांनी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी व्हावे म्हणून विशेष प्रयत्न केलेत.या कार्यक्रमात असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. राजेश ठाकूर,सहसचिव ॲड. विनायक कार्लेकर, कोषाध्यक्ष ॲड. राजेंद्र झुलकंठींवार,ॲड. केनल सरोज व संपुर्ण कार्यकरिणी यांनी आणि ॲड.साफिया शेख,ॲड.सरोज कदम, ॲड.अश्विनी मोगरे,ॲड.प्रीती शिवारकर,ॲड.जयश्री मोगरे,ॲड.चेतना बारसागडे, ॲड.वैष्णवी सराफ, ॲड.तबस्सुंम शेख, ॲड.भक्ती गोलापल्लीवार,ॲड.स्नेहा खिरटकर,ॲड.जयश्री कुरेकर, ॲड.किरण जवांजर, ॲड.सरोज कदम, ॲड.स्नेहा गिरी,ॲड.कल्याणी लाडके व ईतर अधिवक्तांनी यशस्वीपणे सहकार्य केले.


Pages