ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन...#Fulfill the pending demands of OBC community or severe agitation - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन...#Fulfill the pending demands of OBC community or severe agitation

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

ओबीसीच्या वीवीध मागण्या राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबीत आहेत . प्रलंबीत मागण्या पुर्ण कराव्या अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटी ओबीसी वीभागाचे चंद्रपुर ग्रामीण जील्हाध्यक्ष दिवाकर नीकुरे यांनी केली आहे .ओबीसीच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत असुन यासंदर्भात शासनाकडे नीवेदन पाठवीण्यात येणार असल्याचे नीकुरे यांनी म्हटले आहे .#khabarkatta

नीवेदनात करण्यात आलेल्या मागण्यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात यावी , बीहार राज्याप्रमाणे ओबीसीची जातनीहाय जनगणना महाराष्ट्रात करण्यात यावी , ओबीसी मागासवर्गीय तसेच अल्पसंख्याक समाजाशी संलग्न वीवीध महामंडळाची कर्ज माफ करून शासन दरबारी आणी कोर्टात असलेल्या केसेस त्वरीत मागे घ्याव्या , महात्मा फुले आणी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा , नीवडणुकामध्ये ईव्हीएम चार वापर बंद करण्यात यावा , महाविकास आघाडीच्या काळात जील्ह्याच्या ठीकाणी ओबीसी वीद्यार्थ्याना शासकीय वसतीगृह सुरू करण्याच्या नीर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे .#chandrapur

सदर मागण्यांचा केंद्र आणी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून उचीत कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे .या मागण्या पुर्ण न झाल्यास महाराष्ट्र प्रदेश कमीटी ओबीसी वीभागामार्फत दी.15 मे 2023 पासून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागामार्फत ईशारा देण्यात आला आहे .


Pages