सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या...#Fed up with the harassment of the in-laws, the married woman committed suicide - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या...#Fed up with the harassment of the in-laws, the married woman committed suicide

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :



सावळी सदोबा (यवतमाळ) : पारवा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या माळेगाव येथील एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी 7 वाजता घडली.

प्रीती अमोल राठोड (24), असे मृत विवाहितेचे नाव आहे. घटनेची माहिती विवाहितेच्या माहेरी कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. माहेरच्या नातेवाइकांनी किंचाळी फोडत मृतदेहाला कोणालाच हात लावू दिला नाही. सासरच्या मंडळींना अगोदर अटक करा, नंतरच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवा, असा नातेवाइकांचा आग्रह होता. लग्न झाल्यापासूनच सासरच्या मंडळीचा माझ्या बहिणीला मानसिक त्रास दिल्याने प्रीतीच्या भावाने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नमूद केले. माझी बहीण प्रीती माहेरी आल्यावर नेहमी सासरच्या लोकांकडून त्रास असल्याचे सांगत होती, असेही नमूद केले.

पारवाचे ठाणेदार गजानन गजभारे व पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रीतीच्या सासरच्या मंडळीविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रीतीने बाळाच्या पाळण्याच्या दोरीने गळफास घेतला. मात्र, सासरच्या मंडळींनी तिचा घातपात केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे माहेरच्यांनी म्हटले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर माळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत प्रीतीला केवळ एक वर्षाचा लहान मुलगा आहे.


Pages