तरुणीचा हतोडीने खुन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक...#The accused who tried to kill the girl with a hammer was arrested - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



तरुणीचा हतोडीने खुन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक...#The accused who tried to kill the girl with a hammer was arrested

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:



शहरामधील कॉलेज रोडवरील लक्ष्मीनारायण मंदीर जवळ पीडीत तरुणीचे हतोडीने खुन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस ब्रम्हपूरी पोलीसांनी पकडून गजाआड केले. त्याचेवर गुन्हा नोंद करण्यात आला.#The accused who tried to kill the girl with a hammer was arrested

सविस्तर वृत्त दि. 08/03/23 रोजी दुपारी 02.00 वा. दरम्यान यातील पीडीत मुलगी ही आपले आईसह ब्रम्हपूरीवरून बोंडेगाव कडे जात असतांना कॉलेज समोरील लक्ष्मीनारायण मंदीर जवळ आरोपी नामे लवेश वामन देउळकर रा. नान्होरी याने आपल्याजवळील हतोडीने जिव घेण्याच्या इरादयाने तीचे डोक्यावर वार करून जखमी केले. जवळपास उभे असलेल्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत त्यास ताब्यात घेउन ठेवले व पोलीसांना याबाबत माहीती दिली. ब्रम्हपूरी पोलीस ठाण्याचे पोहवा. सचिन बारसागडे हे त्याच भागात असल्याने त्यांनी लगेच घटनास्थळी जाउन आरोपीस ताब्यात घेतले.

पीडीत मुलीचे वैदयकिय उपचारानंतर तिने पोलीस ठाण्यात येउन तक्रार दिली कि. यातील आरोपी हा तीचे आईचा मानलेला भाउ असून तीला वेगवेगळ्या नंबरवरून वांरवार फोन करून त्रास देउन लग्नाची मागणी घालत होता. परंतू तीची आई त्याला भाउ मानत असल्याने तीने नकार देउन फोन न करण्याबाबत वारंवार बजावले होते. त्यामूळे त्या रागातून त्याने तीचेवर जिवघेणा हल्ला केलेला होता. पीडीत मूलीचे तक्रारीवरून आरोपीविरूध्द कलम 307, 354 (ड) भा.दं.वि. सहकलम 3 (2) (v) अ.जा.अ.ज.अ.प्र.का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री. मल्लीकार्जून इंगळे सा. उपविपोअ कार्या. मूल अति. कार्य. ब्रम्हपूरी करीत आहेत.



Pages