पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकारातुन सुशिक्षीत बेरोजगारांकरिता पंतप्रधान रोजगार निर्मीती कार्यक्रमांतर्गत रोजगार मेळाव्‍याचे आयोजन...#job_fair_at_chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकारातुन सुशिक्षीत बेरोजगारांकरिता पंतप्रधान रोजगार निर्मीती कार्यक्रमांतर्गत रोजगार मेळाव्‍याचे आयोजन...#job_fair_at_chandrapur

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:
राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार #sudhir_mungantiwar यांच्‍या पुढाकाराने पंतप्रधान रोजगार निर्मीती कार्यक्रम अंतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोग यांच्‍यामार्फत रोजगार निर्मीतीकरिता कृषी महोत्‍सव चंद्रपूर येथे जनजागृती मेळावा व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. #job_fair_at_chandrapur

दिनांक 25 व 26 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2.00 वा. चांदा क्‍लब ग्राऊंड नागपूर रोड वरोरा नाका, चंद्रपूर येथे सुशिक्षीत बेरोजगारांकरिता रोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.Prime Ministers Employment Generation Programme, #PMEGP

यामध्‍ये खादी व ग्रामोद्योग आयोग यांचे तज्ञांकडून मार्गदर्शनाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. मध्‍ये सेवा उद्योगाकरिता कमाल मर्यादा 20 लाख रूपये व निर्माण उद्योगसाठी कमाल मर्यादा 50 लाख रूपयापर्यंत बॅंकेमार्फत कर्जाची तरतूद करण्‍यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागासाठी 15 टक्‍के ते 35 टक्‍के सबसिडीची तरतूद आहे...# Chandrapur job fair
यामध्ये खनिज आधारित उद्योग, वन आधारित उद्योग, कृषी आधारित उद्योग, पॉलिमर व रसायन आधारित उद्योग, अभियांत्रिकी व अपारंपारिक उर्जेवर आधारित उद्योग, तसेच सेवा आधारित उद्योग या विषयावर खादी व ग्राम उद्योग आयोग येथील तज्ञांकडून मार्गदर्शन तसेच बँकर्स कडून लोन संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ तरूणांनी घ्‍यावा, असे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

Pages