खबरकट्टा/ चंद्रपूर:
दिनांक 11/02 / 2023 रोजी फिर्यादी मागे श्री सुरज बंधुजी पेटुलवार, वय 30 वर्ष, धंदा-शिक्षण, रा. भानापेठ वार्ड, चंद्रपुर यांच्या लहान बहीनीचे नागपुर रोडवरील शकुंतला लॉन, चंद्रपुर येथे होते लग्नाच्या दरम्यान रात्री फिर्यादी सुरज यांच्या मोठी आई सौ. संतोषी पेटुलवार यांच्या हातात असलेली पर्रा ज्यात नववधुचे दाजीने होते ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केली ज्यात एकूण 13,64,000/- स. किंमतीचे सोन्या चांदीये दागीने चोरीस गेले सदरची माहीती पोस्टे रामनगर ला मिळताच पोलीसांनी तात्काळ धाव घेवुन घोरीय गुन्हा दाखल करून तपासात घेतला गुन्हयाची व्याप्ती मोठी असल्याने सदरच्या गुन्ह्याच्या तपास कामी विविध पथके तयार करण्यात आली ज्यात प्रामुख्याने स्थानीक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलीस स्टेशन यांच्या पथकाया समावेश होता.#chandrapur_police
वरील घटनेचा तपास करता असे निष्पन्न झाले की, सदर चोरी ही विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने इतर तीन ते चार आरोपीनी केली आहे आणि सदर आरोपी हे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील असुन एका दुर्गम भागातील आहे. सहा. पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे आणि हर्बल एकरे यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला.
यातील विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेवुन गुन्हयात चोरी गेलेले सोन्या चांदीचे दागीने किंमती 2,21,000/- रु. मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच प्रमाणे आरोपीनी गुन्हयात वापरलेले चार चाकी वाहन कि. 8,00,000/- रू. जप्त करून आणण्यात आले. इतर आरोपी फरार असुन शोध चालु आहे. सदर गुन्हयात एकुण 17,21,000/- रु. चा मुद्देमाल जप्त केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. नि. राजेश मुळे पोलीस स्टेशन, रामनगर हे करीत आहेत.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, उपविभागिय पोलीस अधिकारी, सुधीर नंदनवार, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोस्टे रामनगर, पो. नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर, सपोनि हर्बल अकरे, सपोनि जितेंद्र बोबडे, पोहवा / प्रशांत शेंदरे, नापोशि/ किशोर वैरागडे, नापोशि/पुरुषोत्तम चिकाटे, नापोशि/लालु यादव, नापोशि/ संतोष येलपलुवार, नापोशि/छगन जांभुळे, नापोशि/प्रशांत लारोकर, पोशि/ गोपाल आतकुलवार, पोशि/ कुंदनसिंग बाबरी, पोशि/नितीन रायपुरे, पोशि/रविंद्र पंधरे, पोशि/ विकास जाधव यांनी केली.