चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मंगळवार 14 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
स. ९.३० वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे भेट
स.११ वा. धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या वीज प्रकल्पाची पाहणी व प्रकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी आणि बाधित शेतकरी व गावकरी यांच्याशी भेट व चर्चा
स्थळ - धारीवाल पॉवर प्लांट, ताडाळी, एमआयडीसी,चंद्रपूर
दु.१२ वा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासोबत बैठक
दु.२ वा. बल्लारपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती.
दु.४ वा. शुभप्रसंग मंगल कार्यालय, रेल्वे स्टेशन रोड, ता. भद्रावती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती.
सायं - ५ वा. वेस्टन कोल माईन प्रकल्पामुळे बाधित शेतकरी, गावकरी आणि जनरल मॅनेजर वेस्टन कोल माईन यांच्यासोबत बैठक
सायं - ६ वा. आनंदवन, वरोरा येथे भेट