खबरकट्टा/चंद्रपुर :
जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा टाकला असता 5 आरोपींसह 44.490 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर 5 जुवारी पळण्यात यशस्वी झाले
माजरी शहरातील वस्ती परिसरात जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली नुकतेच माजरी पोलीस ठाण्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर ठाणेदार अजितसिंग देवरे यांनी पोलीस पथकासोबत धडक कारवाई करत जुगार अड्यावर धाड टाकली यात हसन शेख, अनिल शर्मा, मंगेश आस्वले, प्रवीण गोहकरे, अभय खंगार व इतर 5 जण जुगार खेळतांना आढळले दरम्यान 5 जण पळुन जाण्यात यशस्वी झाले तर 44 हजार 490 रुपयांच्या मुद्देमालासह 5 जुगारांना जुगार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.