जलवाहिनी फोडल्याने नऊ गावांचा पाणी पुरवठा बंद - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



जलवाहिनी फोडल्याने नऊ गावांचा पाणी पुरवठा बंद

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
पोंभुर्णा : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे अंडरग्राउंड पाईपलाईनचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कंत्राटदारांनी खोदकाम करून नळ योजनेचे पाईप लाईन फोडल्यामुळे नांदगाव आणि बेंबाळ समवेत नऊ गावांचा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसापासून बंद आहे.

नळ योजनेचा पाणीपुरवठा बंद असल्यामुळे ग्रामीण जनतेला उन्हाळ्याची चाहूल लागताच पाहण्यासाठी भटकंती करावे लागत आहे. विशेष म्हणजे गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे अंडरग्राउंड पाईपलाईनचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक ठिकाणी या कंत्राटदारांनी आपल्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास भोगावे लागत आहे.

नवेगाव भूजला बेंबाळ, नांदगाव, गोवर्धन, घोसरी, चेक दुगाळा, दुगाळा माल, कोरंबी, बाबराळा ही गावे एकाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळवत असल्याने या सर्व गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.पाईपलाईन दुरुस्त होताच वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर जळाला असल्याने तो दुसरा लावतो पर्यंत पेवील पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे येथील सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकावे लागणार आहे.
पाणीपुरवठा करणारी यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी ग्रामस्थानीपाणीपट्टी व गृहकर ठेवला नाही तर काम करणे लवकर सोपे होते असे मत नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर देऊळकर यांनी व्यक्त केले आहे. नांदगाव येथील ग्रामस्थांकडे नगृहकर व पाणी करापोटी 18 लाख 35 हजार रुपये थकीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन संबंधित न ग्रामपंचायतीने व अधिकाऱ्यांनी बिघड तात्काळ दुरुस्त करावा आणि ग्रामस्थांना पिण्याचे पाणी न उपलब्ध करून द्यावे अशी मागणी उपरोक्त सर्व 9 गावातील 7 ग्रामवासीय नागरिकांनी केली आहे.

Pages