चंद्रपूर मनपा मध्ये होणार मेगाभरती : 1010 पदांवर होणार भरती ! 159 पदांच्या नव्या निर्मितीला मिळाली शासकीय मान्यता . - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर मनपा मध्ये होणार मेगाभरती : 1010 पदांवर होणार भरती ! 159 पदांच्या नव्या निर्मितीला मिळाली शासकीय मान्यता .

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

महापालिकेत १४९ पदांची नव्याने निर्मितीला मान्यता दिली आहे. यापूर्वी ७६९ व नव्याने निर्माण करण्यात आलेली १४९ पदे अशा एकूण १०१० पदांच्या आकृतीबंधास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच पालिकेत मेगा भरती होणार असून बेरोजगार युवकांना संधी मिळणार आहे.

चंद्रपूर ही ‘ड’ वर्ग महापालिका असून २०११ मध्ये पालिकेची स्थापना झाली. पालिकेचे कार्यक्षेत्र ५४.२८ चौ.कि.मी असून शहराची लोकसंख्या ३.५० ते ४ लाखाच्या जवळपास आहे. नागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झाली आहे. पालिकेतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे शासनाचे उपक्रम व योजना राबवण्यात दिरगांई होत आहे. त्यामुळे पालिकेला मनुष्यबळ वाढवणे गरजेचे होते.

चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी नव्याने पद निर्मितीचा आराखडा शासनास पाठवला होता. शासनाने ८६९ पदांपैकी ८ पदे व्यपगत करीत नव्याने आवश्यक असलेले १४९ पदांची निर्मिती करण्यास मान्यता दिली असून एकूण १०१० पदांच्या आकृतीबंधास मान्यता प्रदान केली आहे. आकृतीबंधाशी सुसंगती व पदानुक्रमाच्या सोयीसाठी महापालिकेतील काही पदांची नावे बदलवण्यात आली असून संवर्ग, वेतनश्रेणी व ग्रेड पे मध्ये बदल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पालिकेला नव्याने निर्मित पदाच्या वेतनाचा भार सोसावा लागणार आहे.

Pages