खबरकट्टा / ब्रम्हपुरी :
ब्रम्हपुरी तालुक्यात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.महसुल कर्मचारी यांच्या वर प्राणघातक हल्ले केले जात आहे.दिनांक 21 फरवरी ला कालेता साझा चे तलाठी राजेश आकोजवार व तोरगाव बुज साझा तलाठी हिमांशु पाजनकर यांना कहाली गावाजवळ रेती तस्करी करत असलेल्या ट्रॅक्टर ला थांबवले असता रेती तस्करांनी प्राणघातक हल्ला चढवला. यांची तक्रार पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे करण्यात आली आहे.
Deadly attack on Talathi by minor mineral smugglers.
सविस्तर माहिती याप्रमाणे ब्रम्हपुरी तालुक्यातील तपाळ रेती घाटावरून अवैध रेती तस्करी होत असल्याची माहिती तहसीलदार उषा चौधरी यांना देण्यात आले. त्यांनी लेखी आदेश काढून सदर होत असलेली अवैध रेती तस्करी करणाऱ्या वर कारवाई चे आदेश तलाठी राजेश आकोजवार व हिमांशु पाजनकर यांना दिले. वैनगंगा नदी पात्रातील तपाळ घाटातून अवैध रेती तस्करी होत असल्याची माहिती मिळाली.
दोन्ही तलाठी मौजा कहाली गावाजवळ सुमारे सकाळी 10.20 मी एक ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला तर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर न थांबवू समोरील शेतात नेऊन उभे केले. आम्ही दोघे ट्रॅक्टर जवळ गेले असता ट्रॅक्टर बिना नंबर प्लेट असुन ट्रॉली मध्ये अंदाजे एक ब्रास रेती किमंत 3000 रुपये आहे. सदर ट्रॅक्टर चालकांचा परिचय विचारले असता त्यांनी परिचय दिला नाही. आणि सदर चालकाला परवाना विचारले असता कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले.
सदर ट्रॅक्टर आम्ही तहसील कार्यालयात लावण्यासाठी सांगितले तर चालकाने हा ट्रॅक्टर प्रिन्स श्रीनाथ सिंग याचा असल्याचे सांगितले. चालकाने ट्रॅक्टर मालकाची धमकी देऊन ट्रॅक्टर सोडून द्या नाहीतर पाहून घेण्याची ताकीद दिली. लगेच प्रिंन्स श्रीनाथ सिंग हे दोन इसमासह घटनास्थळी येऊन आम्हा दोघांवर हल्ला चढवला. आणि मारहाण केली. कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी दिली. आम्ही ट्रॅक्टर अडविण्यासाठी प्रयत्न केला तर प्रिंन्स श्रीनाथ सिंग व त्याचे दोन सहकारी आम्हाला मारण्यासाठी धावले. प्रसंगावधान बघून आम्ही दोघेही स्व:रक्षणासाठी घटनास्थळावरून पायलन केले.
सदर घटनेची माहिती मंडळ अधिकारी अऱ्हेरनवरगाव व तहसीलदार ब्रम्हपुरी यांना देऊन ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आले. सदर तक्रारी वरून रेती तस्कर प्रिंन्स श्रीनाथ सिंग व इतर सहकारी याच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 अधिनिय 353,379,323,504,506,34 कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपींना अटक करण्यात आली.सदर पुढील तापस पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे याच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक ठवरे करित आहेत.