महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 13 व 14 फेब्रुवारीला चंद्रपूर व गडचिरोलीच्या दौऱ्यावर वर होते. त्यांच्या दौऱ्यादरम्यान 14 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती-वरोरा-चिमूर -ब्रम्हपुरी क्षेत्राचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी भद्रावती येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्याला भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदेंच्या अनुपस्थितीच्या चर्चानां शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात उधाण आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या गटात सद्यास्थिती 2 जिल्हाप्रमुख कार्यभार संभाळत आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाळासाहेब ठाकरे गटात अनेक पदाधिकान्यांनी स्थानिक नेतृत्वावर नाराज होवून उडी घेतल्याने शिवसेनेला खिंडार पडले. पक्षश्रेष्ठीनी ही उणीव भरून काढण्यासाठी सहकार क्षेत्रातील दिगग्ज रवींद्र शिंदे यांना भद्रावती वरोरा व चिमूर विधानसभेचे नेतृत्व दिले. असे असले तरी विधान परिषद विरोधी पक्षनेते दानवे यांच्या दौऱ्यात रवींद्र शिंदेना स्थान मिळाले नाही. त्यामुळे शिदेची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
विधानसभा प्रमुख म्हणून शिंदे यांची नियुक्ती झाल्यानंतर क्षेत्रात जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्यात गटबाजी सूरू झाल्याचे चित्र आहे. शिंदेच्या नियुक्ती वेळेस जिवतोडे यांनीही राजीनामा सत्र सूरू केले होते.त्यास जिल्हा सम्पर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी शिंदेची नियुक्ती थेट उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनात झाली असल्याने कार्यकर्त्यांची नाराजगी मॅनेज करून नेली होती. त्यामुळे आता पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दौऱ्यात शिंदेना बाजूला ठेवण्यात प्रशांत कदम यांचा तर हा माईंड गेम नाही ना? असाही एक विषय शिवसैनिकांत चर्चिला जात आहे.
या सर्व प्रकरणावर शिंदे यांना विचारणा केली असता माझे संघटनात्मक कार्य सूरू राहील अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.
अंबादास दानवे यांचा मला दोन दिवस अगोदर फोन होता त्यांना येथील परिस्थिती संपूर्ण माहीतच आहे. पक्ष मोठा होत आहे, ही आनंदाची बाब आहे. पक्षांतर्गत या बाबी चालत राहतात. मी माझा व शिवसैनिकांचा वेळ फक्त पक्ष संघटनात्मक बांधणी साठी देतो.जी जवाबदारी पक्षप्रमुखानी दिली ती मी सर्व शिवसैनिकाना घेऊन पार पाडेल. शेतकरी प्रश्नासाठी व वरोरा वासीयांना कोल वाहतुकीचा होणारा त्रास याबाबत उच्च न्यायालयात खंडपीठ नागपूर येथे एका जनहित याचिकेनिमित्त मी दिवसभर नागपूर येथे होतो. मला थांबविण्यासाठी राजकीय षडयंत्र सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना जेष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी दिलेली जवाबदारी मी वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख म्हणुन व माझे सामाजिक व संघटनात्मक कार्य सुरू राहील असे त्यांनी कळविले.