सीएसटीपीएस परिसरातील वृक्षांची कत्तल; अभियंता पंकज सपाटे यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची राजेश बेले यांची मागणी - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सीएसटीपीएस परिसरातील वृक्षांची कत्तल; अभियंता पंकज सपाटे यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची राजेश बेले यांची मागणी

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
महा औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर परिसरात महापारेषण कार्यालयासमोर विद्युत केंद्रातील कर्मचार्‍यांनी वृक्षांची केली. बदाम, करंजी या प्रकारच्या वृक्षांची कत्तल करण्यात आली. यापूर्वी पण अनेकदा सीएसटीपीएस परिसरातील वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणाला वातावरणाचे खूप मोठे नुकसान होत आहे. सीएसटीपीएस मानवी जीवनाला घातक वायू प्रदूषण जलप्रदूषण करीत आहे तरीसुद्धा या प्रकारचे कृत्य करून झाडाची कत्तल करणे शुद्ध हवामान नष्ट करणे याकरीता जवाबदार म्हणून सिएसटिपीएसचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे केलेली आहे .
त्या अनुषंगाने 14 फेब्रुवारी 2023 रोजी मोका पंचनामा करून पाहणी केली असता त्या वृक्षाची साल काढून त्या वृक्षाला नष्ट करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. त्याची छाती गोलाई घेतली. करंजी वृक्ष 150 सेमी बदामीचे वृक्ष 195 सेमी चे आहे. सदर झाडाची मोका चौकशी व पंचनामा करून गुन्हा नोंद केला. सदर घटनास्थळी चतुर सीमा घेण्यात आल्या त्यावेळी पंच म्हणून महापारेषणचे सुरक्षारक्षक सचिन गावडे, साईद अहमद याच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. पंचनामा करतेवेळी वन क्षेत्र दुर्गापूर आर पी तिजारे व वनरक्षक दुर्गापुर डीपी दहेगावकर उपस्थित होते.

सदर घटनास्थळी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले व सी एस टी पी एस चे सिव्हिल इंजिनिअर कुराडे उपस्थित होते. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी वृक्षाच्या कत्तलीला जवाबदार सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.

Pages