रक्तदान शिबिर व रक्तदात्याचा सत्कार सोहळ्याचे व्ही कॅन फाऊंडेशन कडून आयोजन - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



रक्तदान शिबिर व रक्तदात्याचा सत्कार सोहळ्याचे व्ही कॅन फाऊंडेशन कडून आयोजन

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
छत्रपती शिवाजी महाराज जयंती सण अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशीच सामाजिक बांधिलकी जपत गडचांदूर येथे व्ही कॅन फाऊंडेशन गडचांदूर मार्फत रक्त दान शिबीर व रक्तदात्याचा सत्कार सोहळा आयोजित करून शिवजयंती साजरी करण्यात आली. सदर शिबिराला 47 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 3 रे वर्ष असून सोबत रक्तदानाला चालना करणारे रक्तदाते यांचा सत्कार करण्यात आला.
मराठा रायडर क्रिकेट क्लब कडून प्रदूषणामुळे त्रस्त गावांना जिथे आरोग्य सुविधांचा अभाव असतो तत्काळ सुविधा मिळत नाही अशा गावांना एक सामाजिक दायित्व म्हणुन नेबुलायझर(वाफारा मशीन) वितरित केल्या.शिबिर संपन्न करण्यासाठी व्ही कॅन फाउंडेशन आणि मराठा रायडर यांच्या टीम ने सहकार्य केले यावेळी शहरातील नागरिक, सामजिक कार्यकर्ते,युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Pages