विद्यार्थांचा शिक्षकांविरूद्ध भर उन्हात रस्ता रोको आंदोलन - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



विद्यार्थांचा शिक्षकांविरूद्ध भर उन्हात रस्ता रोको आंदोलन

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:
जिवती : तालुक्यापासून सात किमी अंतरावर असलेल्या पाटागुडा येथील जिल्हा परिषद शाळेत दांडी बहाद्दर शिक्षक येतच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 'आम्हाला शिक्षक द्या हो शिक्षक' म्हणत शाळेतील पूर्ण विद्यार्थ्यांनीच एकत्र येत चक्क रस्त्यावर उतरून रस्ता जाम केल्याची घटना. समोर आली आहे आणि ती तेजीने समाजमाध्यमातून व्हायरल होत आहे.

शाळेत शिक्षक नसल्याने शाळेतील विद्यार्थी शिक्षकासाठी शेवटी पंचायत समितीच्या दिशेने गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतर पायी प्रवास करीत निघाले. हे प्रकरण पाहत गावचे पोलिस पाटील यांनी टेकामांडवा येथील पोलिस प्रशासनाला माहिती दिली असता सहायक उपपोलिस निरीक्षक रवींद्र म्हेसकर हे आपल्या ताफ्यासह शाळेत पोहोचून विद्यार्थ्याच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी केंद्रप्रमुख बावणे यांनी सांगितले की, तालुक्यात 58 शिक्षकांची रिक्त पदे आहेत. यावर चार दिवसांत शिक्षक देऊन समस्या सोडवू, असे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे, मुलांना दुपारचे जेवणही नव्हते भर उन्हात चटके सहन करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. विद्यार्थी सांगत होते की, आम्ही यावर्षी क्रीडा स्पर्धांची तयारीही केली; परंतु, आम्हाला क्रीडा संमेलनात सहभागी करून घेतले नाही. यावेळी पोलिस पाटील, पोलिस प्रशासन, केंद्रप्रमुख यांनी मुलांची समजूत काढली.

सुटी मंजूर नसतानाही शिक्षक जातात रजेवर

पाटागुडा येथील जि.प. शाळा इयत्ता सातवीपर्यंत असून 62 एवढी पटसंख्या आहे. सदर शाळेतील शिक्षक कधी सुटीवर तर कधी अवेळी येतात. रजा मंजूर नसतानादेखील सुटीवर जातात. यामुळे विद्यार्थ्यांचि शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वरिष्ठांना सहा महिन्यांपासून कळविण्यात येत असल्याचे शा.व्य. समितीचे अध्यक्ष व्यंकटी जाधव यांनी सांगितले,

Pages