खबरकट्टा/ चंद्रपूर:
मूल : येथील प्रसिद्ध कापड व्यापारी बंडू गोगीरवार यांच्या दत्त साडी सेंटर या कापड दुकानाला बुधवारी रात्री 12-1 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. ही माहिती मिळताच मूल पोलिस, नगरपालिका अग्निशमन दल, नगरसेवक प्रशांत समर्थ यांच्यासह परिसरातील नागरिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले.
मात्र,दुकानातील साहित्य जळल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गस्तीवर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक राठोड दुकानाला आग लागल्याचे दिसले. त्यांनी त्वरित माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, दुकान मालक, तसेच अग्निशमन विभागाला माहिती दिली.