पोतरा नदीपात्रात नर जातीचा वाघ मृतावस्थेत आढळला - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पोतरा नदीपात्रात नर जातीचा वाघ मृतावस्थेत आढळला

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :
चंद्रपूर - वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पोतरा नदीपात्रात एक नर जातीचा वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना काल शनिवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. वनाधिकाऱ्यांनी मौका पंचनामा करून मृत वाघाचे चंद्रपुरातील टीटीसी केंद्रात शवविच्छेद केले आहे. मात्र वाघाचा मृत्यु संसयास्पद असल्याच्या चर्चा सुरू असल्यामुळे वनविभागाने त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर (वरोरा) वर्धा (हिंगणघाट ) सीमेवरील पोतरा नदीपात्रात काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास नर जातीचा वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती वरोरा व हिंगणघाट येथील वनविभागाला मिळाली. ज्या ठिकाणी वाघ मृतावस्थेत आढळला ती जागा वनपरिक्षेत्र हिंगणघाटच्या अखत्यारीत आहे की वरोऱ्याच्या, असा संभ्रम बराच वेळ निर्माण झाल्याने वनाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचणे बराच उशीर झाला. या विषयावर बराच खल झाल्यानंतर घटनास्थळ वरोरा वनपरिक्षेत्रात असल्याचे निश्चित झाल्यानंतर वर्धा व वरोरा वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचले आणि संयुक्त पंचनामा केला.

घटनास्थळ मुख्य मार्गावरून आत असल्याने वाघाला तिथून काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. शेवटी, रात्री उशिरा शवविच्छेदनाकरिता मृत वाघ टीटीसी, चंद्रपूरला रवाना करण्यात आले. वाघ नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आल्याने सदर प्रकरणाविषयी वेगवेगळ्या चर्चांना ऐकायला मिळत आहेत. काहींच्या मते ' करंट' लागल्याने वाघ थोडे अंतर चालून नदीपात्रात पडला व तिथेच मरण पावला, तर अन्य व्यक्तींच्या मते वाघ अज्ञात स्थळी मेला व नंतर त्याला नदीपात्रात फेकण्यात अशी ही चर्चा ऐकायला मिळत आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच वाघाच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याची शक्यता आहे. पुढील तपास सहायक वनसंरक्षक निखिता चौरे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे. वनरक्षक नेवारे. केजकर करीत आहे.

Pages