टीपूरांनी उजळले मार्कंडेश्वर मंदिर,नदी तीरावर लावले दिवे - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



टीपूरांनी उजळले मार्कंडेश्वर मंदिर,नदी तीरावर लावले दिवे

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:
चामोर्शी (गडचिरोली) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर यात्रेला प्रारंभ झाला. 14 फेब्रुवारीला अमावस्या असल्याने परंपरेनुसार सायंकाळी ६ वाजता मंदिराच्या कळसावर व नदीच्या तीरावर टिपूर (दिवे) लावण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड बुजूरुक येथील मारोती म्हशाखेत्री यांचे चिरंजीव प्रशांत म्हशाखेत्री व म्हशाखेत्री यांच्या हस्ते टिपूर लावण्यात आले. मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. राजू 4 मार्कंडेश्वराचे मंदिर वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर असून येथे वैनगंगा नदी उत्तर वाहिनी असल्यानेच हे स्थळ भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथे महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेला भाविकांच्यादृष्टीने फार महत्त्व असते.
टिपूर लावताना अरुण गायकवाड, पंकज पांडे, रामू महाराज गायकवाड, उज्ज्वल गायकवाड, दिवाकर भवडकर, उमेश हेजिप यांच्याही हस्ते दिवे लावण्यात आले. दिवे लावण्याचा मान गेल्या अनेक पिढ्यांपासून म्हशाखेत्री कुटुंबाला मिळत आहे हे विशेष. दिव्यांचे महत्त्व असल्याने या दिवशी भाविक आवर्जून उपस्थित असतात. टिपूर लावताना देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, माजी खासदार मारोतराव कोवासे, सहसचिव रामूजी तिवाडे, विश्वजित कोवासे, चंद्रकांत दोषी, साधना दोषी, उपेश हेपिज, नानाजी बुरांडे, दादाजी बारसागडे आदी उपस्थित होते. यावेळी पंढरपूर येथील जगन्नाथ महाराज भजन मंडळ उपस्थित होते.

Pages