खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर शहरातील एमआयडीसी घुग्गस रोड -स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एमआयडीसी शाखेत दरोडा टाकल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
शिवरात्री व शिवजयंती रविवार असल्याने गेल्या दोन दिवसांपासून बँका बंद असल्याने त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बँकेचे लॉकर फोडून त्यात ठेवलेली 14 लाखांची रोकड घेऊन पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांची धावपळ झाली असून पडोली पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी बँकेत दाखल झाले असून, बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
तर काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी एक, पडोली पोलिस ठाण्यातून स्थानिक गुन्हे शाखेत रुजू झालेले पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, तसेच पडोली पोलिस ठाण्यात नवनियुक्त ठाणेदार सुनीलसिंग पवार यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात दरोडेखोरीमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आणि एवढी मोठी घटना घडवून आणणे हे मोठ्या टोळीचे काम असू शकते अशी चर्चा आहे. असाही अंदाज वर्तवला जात आहे.