चंद्रपूरच्या कृषी महोत्सवात दिसली सरपंचांची एकजूट - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूरच्या कृषी महोत्सवात दिसली सरपंचांची एकजूट

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

धनोजे कुणबी समाज मध्यवार्ती समिती तर्फे आयोजित कृषी महोत्सव 2023 येथे सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील बहुसंख्य सरपंच,उपसरपंच या सरपंच परिषदेला उपस्थित होते. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक जयंतदादा पाटील सरपंचांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विधान परिषद सभागृहात सरपंचाचा आमदार असावा. सरपंच उपसरपंच मानधनात वाढ व्हावी. मंत्रालयात सरपंचाना सम्मान मिळाला पाहिजे.सरपंच हा ग्राम विकासाचा कणा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक पर भाषणात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड.देवा पाचभाई यांनी सरपंचानी स्वतःचा आत्मसम्मान जपण्याचा संदेश दिला. सरपंच परिषदेच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद चंद्रपूर माजी सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्रीधरराव मालेकर तर उदघाट्क माजी आमदार सुदर्शन निमकर होते. 

मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंतदादा पाटील तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राज्य सल्लागार तथा जिल्हाअध्यक्ष प्रा राजेंद्र कराळे होते.प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते (धनोजे कुणबी समाज अध्यक्ष चंद्रपूर ),रविंद्र शिंदे, खुशाल रामगिरकर (प्रविण प्रशिक्षक यशदा पुणे),अ‍ॅड जयश्री सातपुते,प्रकाश खरवडे,डॉ. अभिलाषा गावतुरे,अ‍ॅड. विलास माथनकर, रंजित डवरे,विजय बल्की, नंदकिशोर वाढई,सतीश नंदगीरवार  आसवले.प्रा अनिल डहाके तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी. जिल्हा कार्यकारणी कृषी महोत्सव आयोजन समितीचे पदाधिकारी सर्वांनी मेहनत घेतली.

Pages