महाज्योती टॅब वाटप, एकाच वेळी 500 पेक्षा अधिक विद्यार्थीआले : पालकांच्या गर्दीने गोंधळ #Mahajyoti tab distribution, more than 500 students come at once : Confusion due to rush of parents #khabarkatta - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



महाज्योती टॅब वाटप, एकाच वेळी 500 पेक्षा अधिक विद्यार्थीआले : पालकांच्या गर्दीने गोंधळ #Mahajyoti tab distribution, more than 500 students come at once : Confusion due to rush of parents #khabarkatta

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर:#khabarkatta

चंद्रपूर येथील समाज कल्याण विभाग कार्यालयात महाज्योती अंतर्गत 11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप सुरू आहे. एक दिवस अगोदर 500 पेक्षा अधिक विद्यार्थांना टॅब वाटपची माहिती देण्यात आली. त्यात कार्यालयात एकाच टेबल वरून वाटप सुरू असल्याने गोंधळ उडाला आहे.समाज कल्याण विभागाच्या वतीने महाज्योती अंतर्गत वर्ष 21-22 व 22-23 या दोन वर्षाचे टॅब वाटप सुरू आहे. या टॅब वाटपासाठी एकच टेबल असल्याने गोंधळ उडाला आहे. जवळपास पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थांना टॅब वाटप सुरू आहे.#Mahajyoti tab distribution, more than 500 students come at once : Confusion due to rush of parents #khabarkatta 

काल गुरुवारी रात्री सर्व विद्यार्थ्यांना टॅब वाटप होणार आहे याचे संदेश गेल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयात टॅब साठी गर्दी केली आहे. टॅब घेण्यासाठी सकाळपासून जेवणाविना विद्यार्थी ताटकळत होते शिवाय पालकांनीही गर्दी वाढविल्याने समाज कल्याण कार्यालयात गोंधळ उडाला.#khabarkatta

अजूनही विद्यार्थांनची राग समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात आहे. समाज कल्याण अधिकारी यावलीकर यांनी अपुरे मनुष्यबळ असल्याने वाटपाचा एकाच टेबल असल्याचे सांगितले वर्ग अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एमएचसीइटी, नीट चे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी टॅब वाटप सुरू आहेत.#khabarkatta

Pages