चरित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकू व पावशीने वार केल्याची घटना शनिवार दिनांक 7जानेवारी रोजी बल्लारपूर येथे घडली. या कौटुंबिक हमल्यात पती सुद्धा जखमी झाला असून घराबाहेर बसलेल्या शेजाऱ्यांवर सुद्धा वार केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दशरथ जैस्वार हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता, याच रागात त्याने पत्नीवर पावशी व चाकूने वार करून जखमी केले.
ती बचावाच्या बाहेर पळाली असता, तो तिच्या मागे आला व बाहेर बसलेले शेजारी संदेश जैस्वार व इतर दोघांना, 'मला पाहून तुम्ही का हसले' म्हणून त्यांनाही पावशीने जखमी केले. या मारहाणीत पती स्वतःच्या चाकूने जखमी झाला.
आरोपी पती दशरथ श्यामबली जैस्वार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी बल्लारपूर शहरातील गोकुळनगर येथे घडली.