महाराष्ट्र पोलीस दल स्थापनादिनाचे औचित्य साधुन चंद्रपूर जिल्हा पोलीसांनी दिनांक 2 ते 8 जानेवारी या कालावधीमध्ये राबविलेल्या महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताहाचे तसेच "रेजिंग डे" चे समापन रैली संपन्न.
खबरकट्टा / चंद्रपूर : न्यूज डेस्क -
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेसी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनानुसार जिल्हयातील संपुर्ण पोलीस स्टेशन आणि विविध शाखा / विभागामार्फत 'रेजिंग डे' निमित्ताने पोलीस दलातील विविध पोलीस स्टेशन व विविध शाखा आणि कामकाजाबाबतची माहिती समाजातील विविध घटक, नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हयातील विविध शाळा / महाविद्यालय,सोसायटी व इतर ठिकाणी लहान बालके व महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा,वाहतुकीचे नियम,अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम,
अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारा आळा घालण्यासाठी राबविण्यात येणारा विविध योजना तसेच पोलीस दलाची रचना व माहितीसह विविध शस्त्रास्त्रांची प्रदर्शनी लावुन महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह पाळण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेसी यांचे संकल्पनाने गांधी चौक चंद्रपूर ते पोलीस मुख्यालय चंद्रपूर पावेतो “पोलीस वर्धापन सप्ताह समारोपीय रैली” चे आयोजन करण्यात येवुन विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी हिरवी झेंडी दाखवुन सदर रैलीची सुरुवात करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेसी, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, पोलीस उपअधिक्षक शेखर देशमुख, पोलीस निरीक्षक सुधाकर आंभारे पोस्टे चंद्रपूर शहर पोनि श्री राजेश मुळे पोस्टे रामनगर, पोनि प्रवीणकुमार पाटील वाहतुक नियंत्रण शाखा, पोनि श्री संदीप एकाडे पाटील सायबर पो.स्टे., पोनि सुनिल आरकर, मोटार परिवहन विभाग, रापोउपनि सरोदे पो.मु. चंद्रपूर यांचे सह नक्षल विरोधी अभियान पथक (सी-60) चे प्रभारी सपोनि मिलींद पारडकर, दंगा नियंत्रण पथक चे प्रभारी पोउपनि पठाण, बीडीडीएस चे प्रभारी पोउपनि श्री विश्वास, श्वान पथकचे प्रभारी पोउपनि श्री राहुल पाटील, दामीनी तथा भरोसा सेल चे प्रभारी पोउपनि अश्विनी वाकडे, डायल 112 चे प्रभारी पोउपनि अनिल मालेकर आणि रैलीचे सुरुवातीस महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा घेवुन सहा. पोलीस निरीक्षक श्री योगेश खरसान यांचे सह विविध पोस्टे तील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार, पोलीस काका पोलीस दीदी यांचे सह पोलीस श्वान हे रैली मध्ये अत्याधुनिक शस्त्र / अस्त्र व अत्याधुनिक साधन सामुग्रीसह विविध अत्याधुनिक वाहनासह सहभाग घेतला.