नायलॉन मांजाने सायकलस्वार विद्यार्थ्याचा गळा कापला...!! - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



नायलॉन मांजाने सायकलस्वार विद्यार्थ्याचा गळा कापला...!!

Share This
खबरकट्टा / नागपूर :

नायलॉन मांजाने एका सहावर्षीय विद्यार्थांचा गळा कापल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच आज सायंकाळी पुन्ही अशीच जीवघेणी घटना राणी दुर्गावती चौक परिसरात घडली. या घटनेत एका 18 वर्षीय सायकलस्वार विद्यार्थ्याचा नायलॉन मांजाने गळा कापला गेला. यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करुन 16 टाके घालावे लागले.

या दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्याचे नाव शाहनवाज हुसैन मलिक असे असून तो ताजनगर येथील रहिवासी आहे. उत्तर नागपुरातील राणी दुर्गावती चौकातून सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास तो सायकलने आपल्या वडिलांच्या दुकानात जात असताना अचानकपणे मांजा आडवा आल्याने त्याचा गळा कापला गेला.

यामुळे रक्तबंबाळ होऊन तो विव्हळू लागला. नागरिकांनी तातडीने धाव घेऊन त्याला एका खाजगी रुग्णालयात नेले. तिथे 16 टाके घालण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दिवसेंदिवस अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Pages